चिकन चिल्ली ( Chicken Chilli )
वाढणी: ३-४ जणांसाठी
साहित्य:
पाव किलो बोनलेस चिकन, स्वच्छ धुवून छोटे चौकोनी तुकडे करून
१ मोठी भोपळी मिरची, मोठे मोठे चौकोनी काप कापून
२ वाट्या तेल तळण्यासाठी
२ मोठे चमचे बारीक चिरलेली लसूण
२ पातीचे कांदे बारीक चिरून
२ हिरव्या मिरच्या २ इंचाच्या तुकड्यात कापून
१ मोठा चमचा मक्याचं पीठ अर्धा वाटी पाण्यात घोळवून
१ छोटा चमचा डार्क सोया सॉस
अर्धा छोटा चमचा विनेगर
अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
पाव चमचा काळे मीठ
चिमुटभर अजिनोमोटो (चायनीज सॉल्ट )
चिमुटभर साखर
१ कप पाणी
चिकन मुरवण्यासाठी:
अर्धा छोटा चमचा डार्क सोया सॉस
अर्धा छोटा चमचा विनेगर
अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर
चवीनुसार मीठ
पाव चमचा काळे मीठ
चिमुटभर अजिनोमोटो (चायनीज सॉल्ट )
२ मोठे चमचे मैदा
१ मोठा चमचा काॅर्न फ्लोर
सजवण्यासाठी:
कांद्याची पात बारीक चिरून
कृती:
चिकनच्या तुकड्यांना मुरवण्यासाठीचे वर दिलेले सगळे साहित्य घालून चांगले मिसळून मुरण्यासाठी १० ते १५ मिनिटांसाठी बाजूला ठेवायचं.
एका कढईत तेल गरम करून एक-एक करून चिकन चे तुकडे सोडून, मध्यम आचेवर सोनेरी-तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे.
आता एका कढईत, एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवायचं.
तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेली लसूण, कांद्याचा बारीक चिरलेला पांढरा भाग आणि मिरचीचे २-३ मोठे तुकडे टाकायचे.
अर्धा मिनिटभर परतल्यावर गॅस मोठा करून त्यात भोपळी मिरचीचे तुकडे टाकायचे.
२ मिनिटे हे तुकडे मोठा गॅस करून परतले की गॅस बारीक करायचा.
ह्यात मीठ, काळ मीठ, अजीनोमोटो ( चाइनीज़ सॉल्ट ) , काळी मारी पावडर, विनेगर, सोया सॉस घालून एकदा परतून घ्यायचं.
आत्ता ह्यात तळलेले चिकनचे तुकडे घालायचे.
तुम्हांला ज्या प्रमाणात गैह्वी असेल तेव्हढे पाणी घालायचे. अगदी चिमुटभर साखर घालायची.
पाणी उकळले की, त्यात काॅर्न फ्लॉर घातलेलं पाणी घालायचं.
एक उकळी आली की गैह्वी घट्ट झाली की गॅस बंद करायचा.....
Comments
Post a Comment