साहित्य :
मैदा – 100 ग्रम
जीर – ½ चमचा
तेल – 1 चमचा
मीठ – स्वादानुसार
आलू भरण्यासाठी साहीत्य
कांदा – 1 (बारीक चिरलेला)
हिरव्या मिरची – 2-3 (बारीक चिरलेला)
अद्रक पेस्ट – 1 चमचा
कोथिंबीर – गरजेनुसार
आलू – 4-5 (उकडलेले)
हळद पावडर – ½ चमचा
धणेपूड – 1 चमचा
जिरे पावडर – 1 चमचा
तेल – आवश्यकतानुसार
Samosa Recipe
समोसा बनविण्याचा कृती :
समोस्याचे बाहेरील आवरण आधी बनवु या.
सर्वप्रथम मैदा, मीठ व थोडे तेल घेवून एका भांड्यात चांगले मिसळून थोड पाणी घाला व त्याची कडक कणिक बनवा त्यात थोडा बेकिंग सोडा घाला व त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या.
मसाला बनविण्याची विधी
आळूची साल काढून त्याच्या गरास चांगले बारीक करून घ्या. कढईत तेल घेवून त्यात कांदा, जीर, अद्रक पेस्ट, हिरव्या मिरच्या चांगल्या होऊ द्या व त्यात आलूचा गर घाला. 2-3 मिनिटे होवू द्या. त्यात हळद, जिरे पावडर, मीठ घालून होऊ द्या. नंतर 5 मिनिटांनी काढून घ्या. थंड होऊ द्या.
आट्याच्या पुरयामध्ये आलूची चटणी भरा व समोस्याचा आकार देवून तयार करावे. कढईत तेल घेवून त्यात हळूहळू समोसे टाका व तपकिरी रंगाचे होई पर्यंत तळा व गरमागरम खायला द्या.
टीप -
समोसे बनविण्याची रेसीपी तुम्हाला आवडली असेल किवा यामध्ये काही बदल करावयाचे असल्यास आम्हाला कमेन्ट मधे जरुर टाका.....
Comments
Post a Comment