Pani Puri


 

पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

1 वाटी रवा

2 टेबल स्पून मैदा

1 टीस्पून मिठ

1/2 टीस्पून सोडा 


पाणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

1 वाटी पुदिना

1 वाटी कोथिंबीर

4 हिरव्या मिरच्या

1 इंच आले

1/2 लिटर थंड पाणी

1 टीस्पून जिरेपूड

1 टीस्पून काळ मिठ

1 टेबल स्पून चिंच चा गर (इमली केचप)


मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य

4 मध्यम आकाराचे उकडलेले आलुतेदार

1 टीस्पून तिखट

1 टीस्पून चाट मसाला

तेल

मिठ

पायर्‍या


सर्वप्रथम एका भांड्यात एक वाटी रवा,दोन टेबलस्पून मैदा,एक टीस्पून मीठ,अर्धा टीस्पून सोडा, एक टेबल स्पून तेल,घालून ते एकजीव करून घ्या.नंतर त्यात गरम पाणी घालून घट्टसर गोळा करून घ्या,आणि एका कॉटनच्या कपड्याने तो गोळा रेप करून एका भांड्यात झाकून ३०मिनटे ठेवून द्या,


पाणी पुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 1


नंतर 30 मिनिटं झाली की त्याचा एक गोळा काढून चपाती सारख लाटुन त्याच्या बारीक बारीक एका छोट्याशा वाटीणे पुऱ्या तयार करून घ्या नंतर त्या एका कढईत गरम तेल करून त्या पुऱ्या गरम तेलात तळून घ्या पुऱ्या तयार,पाणी साठी लागणारी चटणी करण्यासाठी एक मिक्सर च्या भांड्यात चार-पाच मिरच्या एक वाटी कोथिंबीर एक वाटी पुदिना दोन-तीन लसणाच्या कळ्या अर्धा इंच आले आणि थोडे पाणी घालून छान पेस्ट तयार करून घ्या


पाणी पुरी (pani puri recipe in marathi) रेसिपी स्टेप 2 


नंतर एका वाट्यात थंड पाणी घेऊन त्यात आपण केलेली पुदिन्याची चटणी काळमीठ, साधं मीठ, जिरे पावडर,पाणीपुरी मसाला, घालून छान एकजीव करून घ्या, आणि थोडी रेडिमेट बुंदी घालावे, तयार पाणीपुरीचे पाणी, नंतर मसाला बनवण्यासाठी साठी चार उकडलेले आलु त्यात पुदिन्याची चटणी,तिखट जिरे पावडर,मीठ, घालून एकजीव करून घ्या, नंतर कांद्याचे बारीक काप ठेव, आपल्या परिवाराला खायला चटपटी पाणी पुरी तयार.......







Comments