पनीर चिली -Paneer chilli
Sharing : ४ माणसांसाठी
साहित्य:
३०० ग्रॅम ताजे पनीर
१ कप उभा चिरलेला कांदा
१ कप भोपळी मिरची उभी चिरून
६-७ लसूण पाकळ्या चिरून
२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून
१ टीस्पून विनेगर
१/४ टीस्पून मिरपूड
१/४ कप डार्क सोया सोस
मीठ चवीप्रमाणे
१ चिमुट सोयाबीन
तेल
कृती:
१. पनीरचे चौकोनी तुकडे करा.२ टेबलस्पून कॉर्नफ्लोर मध्ये २ चिमुट मीठ घाला त्यात १/४ कप पाणी घालून जाडसर मिश्रण तयार करा. पनीरचे तुकडे त्यात घोळवून तेलात गोल्डन ब्राऊन रंगावर शालो फ्राय करून घ्या.
२. कढईत २ टेबलस्पून तेल गरम करा आणि त्यात लसूण फोडणीला घाला.लसूण परता आणि लगेच हिरवी मिरची कांदा आणि भोपळी मिरची घालून परता.
३. २ टेबलस्पून सोया सॉस, अजिनोमोटो, मीठ,मिरपूड, विनेगर घाला. भाज्या ३-४ मिनिटे परतून घ्या. भोपळी मिरची अर्धवट शिजे पर्यंत परता.
४. पनीरचे तुकडे घालून परता.
५. उरलेल्या कॉर्नफ्लोरमध्ये १/२ कप पाणी, ४-५ टेबलस्पून सोया सॉस,२ चिमुट मीठ, घालून मिश्रण करा. आणि उकळायला ठेवा. उकळी आली कि सॉस जाडसर होऊ लागेल. एकीकडे सतत ढवळत रहा. सॉस जाड झाला कि पनीर आणि भाज्यांवर ओता.वरून कांद्याची पात घाला आणि एकदा परतून लगेच शेअर करा.
Comments
Post a Comment