Paneer Tikka
साहित्य
सर्विंग: 4
पनीर / काॅटेज चीज - 250 ग्रॅम ( तुकडे केलेले )
कांदा - 1 ( मोठा चिरलेला )
टोमॅटो - 1 मोठा
सिमला मिरची - 1 मोठी ( लहान चिरलेली )
भाजलेले हरभरा पीठ - 2 टेबल स्पून
बांधून ठेवलेले दही - 1/4 कप
आल्ले लसूण पेस्ट - 1 टी स्पून
हळद - 1/4 टी स्पून
काश्मीरी लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
धणे पावडर - 1 टी स्पून
काळी मिरी पावडर - 1/4 टी स्पून
गरम मसाला पावडर - 1 टी स्पून
लिंबाचा रस - 1 टी स्पून
चवीनुसार मीठ
तेल - 4 टेबल स्पून
कांदा - 1 मोठा ( पेस्ट )
आल्ले लसूण पेस्ट - 1 टी स्पून
जीरे - 1/2 टी स्पून
टोमॅटो - 1 मोठा
वेलदोडे - 2
दालचिनी - 1 इंच
लवंगा - 2
हळद पावडर - 1/4 टी स्पून
काश्मीरी लाल मिरची पावडर - 1 टी स्पून
धणे पावडर - 1 टी स्पून
गरम मसाला पावडर - 1 टी स्पून
कसुरी मेथी - 1/2 टी स्पून
योगर्ट - 2 टेबल स्पून
ताजी मलाई - 2 टी स्पून
सजविण्यासाठी - कोथिंबीर
चवीनुसार मीठ
तेल
कृती :
मैरीनेट करण्यासाठी : एका बाऊलमध्ये आल्ले लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पावडर, धणे पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला पावडर, लिंबाचा रस आणि मीठ एकत्रीत करावे आणि चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे.
उच्च आचेवर तेल गरम करावे, आंच बंद करावी आणि हळद टाकावी .
आता पनीरचे तुकडे आणि चिरलेल्या भाज्यांचे तुकडे टाकून त्याना मसाला व्यवस्थित लागल्याची खात्री करावी .
हे कमीत कमी 2 तास फ्रीजमध्ये ठेवावे, त्यानंतर ते बाहेर काढून त्याला रूम तापमानात येऊ द्यावे.
मॅरीनेट केलेले पनीर आणि भाज्या आळीपाळीने सळईला लावाव्यात.
अगोदर 200 सी उष्णता असलेल्या ओव्हनमध्ये 15-20 मिनिटे किंवा पनीर व भाज्या तांबूस होईपर्यंत ग्रील कराव्यात.
रश्श्यासाठी : कढईत तेल गरम करून त्यात वेलदोडे, दालचिनी, लवंगा आणि जीरे टाकावे. तडतडायला सुरू होईपर्यंत तळावे.
कांद्याची पेस्ट टाकून सोनेरी तांबूस रंग येईपर्यंत परतावे.
आता आल्ले लसूण पेस्ट घालून काही मिनिटे परतावे, त्यानंतर प्युरी केलेले टोमॅटो घालून उच्च तापमानात 1 मिनिटे शिजवावे.
त्यात धणे पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला व मीठ घालावे. तेल वेगळे होईपर्यंत शिजवावे.
योगर्ट घालून चांगले ढवळावे. पाणी टाकून रस्सा घट्ट व्हायला सुरुवात होईपर्यंत 5 मिनिटे शिजवावे. सुसंगती जुळवून घ्यावी.
ताजी मलाई व कसुरी मेथी टाकून चांगले ढवळावे. हळु हळु पनीर टिक्का आणि भाज्या मिसळाव्यात आणि हलकेच ढवळावे .
कोथिंबीरीने सजवून गरमागरम खायला द्यावे.
Comments
Post a Comment