साहीत्य :
भाज्या
2 गाजर
2 मिरची हिरवी
2 शिमला मिरची
1/2 वाटी चिरलेली पत्तागोबी
2 बटाटे
2 वांगी
2 टमाटर
1/2 वाटी हिरवा वाटाणा
2 कांदे
1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
1/2 टेबल स्पून कस्तुरी मेथी
1 टेबल स्पून अद्रक लसणाची पेस्ट
1 टेबल स्पून तिखट
हाफ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
2 पॅकेट पाव
4 टेबलस्पून भाजीसाठी बटर
1/4 शेकण्यासाठी वेगळं बटर
पावभाजी मसाला साहित्य
1 टीस्पून जिरे
1 टिस्पून मिरे
1 टीस्पून बडीसोफ
2 टेबलस्पून तिखट चवीनुसार
1/2 टी स्पून हळद
2 टेबल स्पून आमचूर पावडर
चिमुटभर हिंग
4 तेजपान
सहा-सात लवंग
4 छोटी विलायची
1 मोठी विलायची
कृती :
प्रथम वरील सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घ्याव्यात... शिमला मिरची आणि कांदा थोडा बारीक चिरून घ्यावा.
पावभाजी रेसिपी स्टेप 1 :
नंतर शिमला मिरची आणि कांदा सोडून बाकी सगळ्या भाज्या कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल अर्धा टेबल स्पून जीर टाकून तेलात परतून घ्याव्यात. नंतर त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून शिजवून घ्याव्यात.
पावभाजी रेसिपी स्टेप 2 :
नंतर एका कढईत चार टेबलस्पून बटर टाकावे. त्त्यात कांदा,शिमला मिरची,अद्रक लसणाची पेस्ट हे क्रमाक्रमाने टाकून छान परतून घ्यावे.
पावभाजी रेसिपी स्टेप 3 :
कांदा छान गुलाबी झाल्यावर शिमला मिरची छान शिजल्यावर त्यामध्ये तिखट,थोडीशी हळद पावभाजी मसाला,मीठ,थोडीशी कोथिंबीर, कस्तुरी मेथी टाकून परत हे मसाले छान होऊ द्यावेत.
पावभाजी रेसिपी स्टेप 4 :
नंतर या जिन्नसामध्ये कुकर मध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या छान स्मॅश करून घ्याव्यात. व भाजी छान शिजू द्यावी. त्यानंतर इकडे तव्यावर बटर टाकून पाव छान शेकून घ्यावा
पावभाजी रेसिपी स्टेप 5 :
नंतर एका प्लेटमध्ये भाजीवर छान कोथिंबीर,कांदा, लिंबाचा रस पिळावा व ती भाजी गरमागरम बटर लावून दिलेल्या पावासोबत खाण्याचा आनंद घ्यावा.
पावभाजी रेसिपी स्टेप 6 :
आता पावभाजीच्या मसाल्याची कृती.... वरील सगळे खडे मसाले कमी गॅसवर तव्यावर छान भाजून घ्यावेत. पावडर मसाले यात टाकू नयेत.
पावभाजी रेसिपी स्टेप 7 :
मसाले भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यावेत
पावभाजी रेसिपी स्टेप 8 :
मसाला थंड झाल्यावर मिक्सर च्या पोट मध्ये टाकावेत व त्यामध्येच पावडर मसाले तिखट हळद,आमचूर पावडर, हिंग टाकून बारीक करून घ्यावेत. अशाप्रकारे घरच्या घरी आपला पाव भाजी मसाला अगदी झटपट तयार होतो. आणि हवाबंद डब्यात ठेवल्यास नेहमी वापरता पण येतो.
Comments
Post a Comment