Tea

 


वेळ: ५ मिनिटे

वाढणी: ४ जणांसाठी



साहित्य:

२  कप पाणी

अडीच  कप  गायीचे दुध

३ ते ४ चमच साखर किंवा चवीनुसार

२  चमच चहा पावडर

१/२  किसलेले आले किंवा २ पाती गवती चहा किंवा १/२ ठीसलेली वेलची पूड किंवा दीड चमचा चहाचा मसाला


कृती:

१) दुध आणि पाणी पातेल्यात एकत्र करा. साखर आणि आले/गवती चहा/वेलचीपूड/चहाचा मसाला घालून मोठ्या आचेवर पातेले ठेवावे.

२) दुध-पाणी वाफाळायला लागले, की त्यात चहा पावडर घालून आच मध्यम करावी. [पाण्यामध्ये दुध घातले असल्याने मिश्रण उकळल्यावर उतू जाते. म्हणून चहाकडे लक्ष ठेवावे.]

३) चहा १-२ मिनिटे उकळू द्यावा. आच बंद करून चहा मिनिटभर झाकून ठेवावा. नंतर गाळून गरमच सर्व्ह करावा.


टीप:

१) साखरेचे प्रमाण चहा मध्यम गोड होईल असेच दिले आहे. जास्त गोड हवा असल्यास साखरेचे प्रमाण वाढवावे..




Comments